टोकियो – जपानची राजधानी टोकियोचा परिसर आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असल्याची नोंद झाली आहे. जपानची राजधानी टोकियो पासून 86 किलो मीटर अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (एनसीएस) यांनी दिली आहे.
रिश्टर स्केलवर 5.6 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंद झाली आहे. टोकियोसह आजूबाजूच्या परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपामध्ये जीवित हानी आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.