Pune District | राजगड तालुक्यात कडाक्याची थंडी
Updated On:

विंझर, – वेल्हे (राजगड) तालुक्यामध्ये यंदा कडाक्याची थंडी वाजू लागली आहे. वेल्हे (राजगड) तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी वाढल्याने तालुक्यातील बऱ्याच नागरिकांना सर्दी, खोकला, पडसे इ आजार उद्भवू लागले आहेत. त्यामुळे आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.
अनेक नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. संध्याकाळी ६ नंतर आणि सकाळी सकाळी घरातून बाहेर पडायचे म्हटले तर अनेक नागरिकांच्या कडाक्याच्या थंडीमुळे अंगावर काटा येत आहे.
त्यामुळे आशा कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी करणे, स्वेटर, कानटोपी यांसारख्या उपाययोजना तालुक्यातील नागरिक करत आहेत. मात्र, ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक ठरेल, म्हणून शेतकरी मात्र आदंदित झाला आहे. गहू, ऊस व इतर फूलशेती, फळबागांसाठी कमी तापमान हे लाभदायी ठरणार आहे.





