नवी दिल्ली – देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या अनेक विमानांची उड्डाणे उशीर होत आहेत. आता या प्रकरणी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाची कठोर दखल घेतली आहे.
Several IndiGo flights across the country delayed after the non-availability of crew members. pic.twitter.com/8km8evAQY1
— ANI (@ANI) July 3, 2022
डीजीसीएने संपूर्ण देशभरात इंडिगोच्या फ्लाइटला उशीर होण्यामागील कारणाबाबत एअरलाइनला उत्तर देण्यास सांगितले आहे. वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील इंडिगो एअरलाइन्सची विमाने नियोजित वेळेपेक्षा उशिराने उड्डाण करत आहेत. क्रू मेंबर्सची उपलब्धता नसणे हे याचे कारण सांगितले जात आहे.