जिल्ह्यात सात बाधितांचा मृत्यू

सातारा  -जिल्ह्यातील सात करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष टव्हाण यांनी दिली. त्यामुले जिल्ह्याती एकूण करोनाबळींची संख्या 1422 इतकी झाली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार
घेत असलेल्या दुर्गा पेठ, ता. सातारा येथील 57 वर्षीय महिला, कुसुंबी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील 90 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये पाटखळ ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, व्याजवाडी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, म्हसवड, ता. माण येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण सात करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

698 जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आणि करोना केअर सेंटरमधून शनिवारी संध्याकाळपर्यंत 698 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर 372 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 34, कराड 10, फलटण 20, कोरेगाव 45, वाई 21, खंडाळा 20, रायगाव 43, पानमळेवाडी 66, महाबळेश्‍वर 10, दहिवडी 17, खावली 18, पिंपोडा 4 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 64 अशा एकूण 372 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.