सात-बारा आठ (अ) शासकीय कामासाठी ग्राह्य नाही

नगर  – आपले सरकार केंद्रात सातबारा आठ (अ) शासकीय कामासाठी ग्राह्य नाही याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने जारी केले असून यापुढे शिक्के मारून साक्षांकीत करणाऱ्या आपले सरकार केंद्र चालकावर कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने महसूल विभागातील भूमिअभिलेख या संकेतस्थळावर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी निशुल्क सातबारा व आठ (अ) देण्यात येतो. त्यावर वॉटरमार्क असे लिहिलेले असते. मात्र तेच सातबारा व आठ (अ) प्रिंट करून आपले सरकार सेवा केंद्र संचालक आपले शिक्के मारून साक्षांकित करून शेतकऱ्यांना सशुल्क देत असल्याची बाब महसूल विभागाने माहिती तंत्रज्ञान विभागाच्या लक्षात आणून दिली.

या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने 19 डिसेंबर रोजी या परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सातबारा व आठ (अ) संबंधित ई-महाभूमी असे छपाई केले व त्यावर आपले सरकार सेवा केंद्राने सही शिक्कानिशी अभिलेखांच्या नकलांचा होणाऱ्या गैरप्रकारास आळा बसावा यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेली आहे. त्यामध्ये भूलेख महाभूमी संकेतस्थळावरील माहिती फक्त माहितीसाठी असून त्याच्या प्रती कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य मानण्यात येणार नाही.

कोणताही आपले सरकार केंद्रचालक भूलेख महाभूमी संकेतस्थळावरील गा. न. नं. सातबारा व आठ (अ) च्या प्रतीवर सत्यतेची पडतानी केल्याबाबत सही शिक्का मारून वितरीत करेल अशाप्रकारची बाब निदर्शनास आल्यास संबंधित तहसिलदार यांनी त्याबाबत रितसर चौकशी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करावी व जिल्हाधिकारी यांनी जोशी विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.