रासे येथे आमदार सुरेश गोरे यांचे आश्वासन
रासे- रासे-भोसे (ता. खेड) परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु असून ते काढण्यात येतील, असे आश्वासन आमदार सुरेश गोरे यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांची “जनआशीर्वाद यात्रा’ रासे परिसरातील गावात झाली, त्यावेळी रासे येथे ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेताना ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, आरपीआयचे संतोष डोळस, पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे, भाजपचे सरचिटणीस सूर्यकांत मुगसे, माजी सरपंच रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मुंगसे, अनिकेत केदारी, किरण गवारे, सागर मुऱ्हे, चंदन मुऱ्हे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, या भागातील कचरा डेपो प्रश्न सोडविण्यात येईल. या परिसरात अनेक विविध विकास कामे मार्गी लावली आहेत अजूनही उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यात येतील. तसेच शिवसेना पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची या परिसरात नाती-गोती असल्याचे त्यांनी नमूद केले. या जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने सूर्यकांत मुंगसे, प्रवीण मुंगसे, अनिकेत मुंगसे यांनी गावाच्या विकासाबाबत गोरे यांच्याशी हितगुज केले. सूत्रसंचालन व आभार लक्ष्मीकांत मुंगसे यांनी मानले.