सात हजार कोटीचा भूखंड घोटाळा 

विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार ः विशेष तपास पथकाकडून चौकशी करा 

मेट्रोच्या खांबांना 500 कोटींचा रंग 
नागपूर मेट्रो प्रकल्पात खांबांना रंग लावण्याचे काम तब्बल पाचशे कोटी रुपयांना काढले आहे आणि सागरी विभागात लावण्याचा रंग तिथे लावण्याचे घाटत आहे. या प्रकरणाची चौकशी कऱण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.  

मुंबई – जुहु येथील राज्य सरकारच्या मालकीच्या शेकडो कोटी रुपयांच्या भूखंडाची महसूल अधिकाऱ्यांनी व एसआरए योजनेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यामध्ये 7 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून विशेष तपास पथक नेमून चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत अंदाजपत्रकातील विभागवार मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना नगर विकास व महसूल विभागाच्या मागण्यांवर ते बोलत होते. बॉंबे कन्स्ट्रक्‍शन कॉर्पोरेशनला ब्रिटीश काळात शासनाने मुंबई उपनगरातील मोठी जमीन लीजवर दिली होती. त्याची मुदत संपन्यानंतर 1997 मध्ये अजमेरा बिल्डरने त्या नावाशी साधर्म्य असणारे नाव धारण करणाऱ्या बॉंबे कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या मार्फत या भूखंडाचा ताबा घेतला.

खोट्या कागदपत्रांनिशी त्यांनी केलेले भूखंडाचे करारपत्रच उच्च न्यायालयाने 2004 मध्ये रद्द्‌ केले. पण त्यानंतरही एसआरए व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजमेराला तो भूखंड तिसऱ्या कंपनीला शेकडो कोटी रुपयांना विकण्याची परवानगी दिली. त्या विरोधात महसूल राज्य मंत्र्यांकडे अपील झाल्यानंतरही एसआरएचे मुख्य अधिकारी झेंडे यांनी त्या भूखंडावरील लाखो चौरस फुटांच्या एसआरए योजनेला परवनागी दिली या सर्व प्रकरणाची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.