सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील करोना संशयित ३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर जिल्ह्यात तीन नव्या संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात १३ व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील १अशा एकूण १४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर घेण्यात आलेल्या कराड-६, फलटण-६ कोरेगाव-१, वाई-३ असे एकूण १६ कोविड-१९ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच जिल्हा रुग्णालयात रविवारी दि. १२ एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे ३ नागरिकांना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ३ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.