सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ११ संशयित रुग्णांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच १८ नवीन संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या एक व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या दहा अशा एकूण ११ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच शनिवारी दि. 11 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये १३ व फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात ५ अशा १८ जणांना कोविड- १९ संशयित रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व अठरा जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.