साताऱ्यात ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात: सहा जण जागीच ठार

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा प्रवासी ठार झाले, तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सातारा शहरानजीक असलेल्या खंडेवाडीजवळ सकाळी हा अपघात झाला. अपघातातील मयत आणि जखमी प्रवाशी कर्नाटकातील असल्याचे समजते.

पुणे-बंगळुरू महामार्गावरून कोल्हापूरकडे मालवाहतूक करणारा ट्रक जात होता. या ट्रकमागेच प्रवासी वाहतूक करणारी खासगी बसही जात होती. दरम्यान, सातारा शहरानजीक असलेल्या खंडेवाडीजवळील उतारावर अचानक ट्रकचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाने ट्रक जागीच थांबवला. यावेळी भरधाव असलेली खासगी बस पाठीमागून ट्रकवर जोरात आदळली. या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर जखमींना जवळच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. घटनेतील मृत आणि जखमी प्रवासी कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)