नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये जिल्हा राखीव दलास मोठे यश मिळाले आहे. इथल्या राजनंदगावमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जिल्हा राखीव गार्डच्या दलाबरोबर झालेल्या चकमकीत हे सात नक्षलवादी ठार झाले आहेत. राजनंदगावमध्ये बागनदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सीतागोटा जंगलात ही चकमक झाली. यात हे नक्षलवादी ठार झाले.
छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी यांनी ही माहिती दिली. सीतागोटा जंगलात जिल्हा राखीव दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली होती. त्यात सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. छत्तीसगड सध्या नक्षलवाद्यांचे तळ बनत चालले आहे त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी लष्कराकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे आज झालेली कारवाई ही मोठी असल्याची मानली जात आहे.