मुंबई: महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर टीकेचा धनी ठरलेला मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटूहार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या सात महिन्यांचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. पुढे काय करायचे हे सूचत नव्हते, असे हार्दिक म्हणाला.
यावेळी बोलताना हार्दिक पुढे म्हणाला की, संघाला विजय मिळवून देण्यात मदत करणे आणि त्यात आपला वाटा असणे ही आनंदाची गोष्ट आहे.
गेल्या सात महिन्यात फार कमी वेळा मला खेळण्याची संधी मिळाली. त्या सात महिन्यांचा कार्यकाळ माझ्यासाठी फार अवघड होता. काय करायचे मला काहीच कळत नव्हते. मी फक्त फलंदाजी करत होतो. मला माझा खेळ अजून चांगला करायचा होता. तुम्ही तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावता ही भावना जबरदस्त आहे. असे म्हणत हार्दिकने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
हार्दिक पांड्याहा “कॉफी विथ करण’ या टीव्ही शोमध्ये महिलांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वादात अडकला होता. मात्र, आता आपण ते सगळ विसरुन पुढे आलो असल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले आहे.