नोकरी लावतो म्हणून सात लाख लुबाडले

लोणीकाळभोर पोलिसांत पती-पत्नी विरोधांत गुन्हा दाखल

लोणी काळभोर – हडपसर येथील एका खासगी कंपनीत मुलास नोकरीस लावतो, असे सांगुन 7 लाख रूपये घेवुन कामास न लावता फसवणूक केली म्हणुन पती-पत्नी विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अनिता सयाजी चोरघे (वय 38, रा. सोरतापवाडी, गणेशगर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अभिजीत पाटील व त्यांची पत्नी वंदना पाटील (दोघे रा. सोरतापवाडी, गणेशगर, ता. हवेली, मूळ रा.बोरगाव, ता.इस्लामपुर, जि.सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेली माहिती अशी की, 2016 पासुन अनिता चोरघे यांच्या शेजारी राहणारे दादा शेलार यांच्याकडे पाटील पती-पत्नी भाडेतत्वावर राहण्यास होते. त्यामुळे चोरघे यांची त्यांच्याशी ओळख होती. माझी हडपसर, पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये चांगली ओळख आहे. मी त्यास कायम स्वरूपी नोकरीस लावतो, तुम्ही 7 लाख रूपये द्या. दि. 25 मे 2018 रोजी अनिता चोरघे यांनी 5 लाख रूपयाचा धनादेश वंदना पाटील यांच्या नावे व रोख रक्कम 2 लाख रूपये दिले.

पाटील यांनी 29 मे रोजी बॅंकेतून 5 लाख रूपये काढुन घेतले. त्यानंतर मात्र पाटील यांनी चोरघे यांच्या मुलास नोकरी लावली नाही. याबाबत सातत्याने संपर्क करूनही पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच पैसेही दिले नाहीत. त्यानंतर ते गावी निघून गेले, म्हणून दि. 4 जून 2019 रोजी चोरघे पती-पत्नी मुलासमवेत पाटील यांच्या घरी (बोरगाव, ता. इस्लामपुर, जि.सांगली) येथे गेले. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता आम्ही दोन दिवसामध्ये सोरतापवाडी येथे येवूून तुम्हाला नोटरी करून देतो. तरी पण तुम्ही आम्हाला त्रास दिला तर तुमच्यावर सावकारीची केस करतो, अशी धमकी दिली.

त्यानंतर ते आले नाहीत म्हणून चोरघे यांनी फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते फोन घेत नव्हते. फसवणूक झाल्याची खात्री झाली त्यानंतर त्यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जावून तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.