- दोघांना अटक
पिंपरी – चिखली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे सात लाख रुपयांचा 27 किलो 500 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 17) दुपारी सव्वाएक वाजता केली आहे.
राहुल भीमराव पवार (वय 21, रा. ओटास्कीम, निगडी), अमोल अशोक शिंदे (वय 26, रा. अंकुश चौक, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार प्रमोद जयराम लांडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीमधील सेक्टर क्रमांक 19 येथे सर्व्हिस रोडच्या बाजूला एका झाडाखाली दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा 27 किलो 500 ग्राम गांजा आणि 90 हजारांची पल्सर दुचाकी असा एकूण 7 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले दोन्ही आरोपी गांजा विक्रीसाठी आले असल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे.