काबुलमधील स्फोटात सात ठार

काबुल : काबुल शहरात आज सकाळीच गजबजलेल्या भागात झालेल्या बॉम्बस्फोटात सात जण ठार झाले आहेत. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथून अंतर्गत मंत्रालय जवळच आहे. तसेच काबुल एअरपोर्टचाही भाग येथून जवळच आहे. त्यामुळे ही एक सुरक्षा विषयक गंभीर घटना मानली गेली आहे.

आत्मघाती पथकातील गनिमाने स्फोटकाने भरलेली कार उडवून देऊन हा प्रकार घडवल्याचे सांगितले जात आहे. त्या संबंधीचा अधिक तपशील अजून प्राप्त झालेला नाही. अफगाणिस्तानातील सरकार तलिबानशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच ही घटना घडली आहे त्यामुळे सरकार आणि तालिबान यांच्यातील संघर्ष पुन्हा अधिक रक्तरंजीत होईल काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कालच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी तालिबानचे तीन मोठे नेते कारागृहातून सोडले आहेत. तालिबान्यांनी काही पाश्‍चिमात्य नागरीकांना सन 2016 पासून ओलीस ठेवले आहे त्यांची सुटका करण्याच्या बदल्यात या तीन नेत्यांना सोडून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांना कारागृहातून सोडले असले तरी त्यानुसार तालिबान्यांनी पाश्‍चिमात्य नागरीकांची सुटका केली की नाही हे मात्र अजून समजलेले नाही.

या घटनेवर भाष्य करताना अध्यक्ष घनी यांनी म्हटले आहे की आम्ही तालिबानी नेत्यांची सुटका करून त्यांच्याशी चर्चेसाठी पुन्हा एकदा अनुकुल वातावरण तयार केले आहे. तथापी आजच्या बॉंबस्फोटाने या विश्‍वासाच्या प्रयत्नांना पुन्हा तडा गेला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)