नवी दिल्ली (दि. 29) – भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू एस. पी. सेतुरामन याने बार्सिलोना ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. दोन मोसमांत विविध स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे रद्द झाल्या होत्या. आता हा धोका कमी झाल्यावर घेण्यात आलेली ही स्पर्धा जिंकत सेतुरामनने धडाक्यात सुरुवात केली आहे.
सेतुरामन व रशियाच्या डॅनिल युफाने नऊ फेऱ्यांमध्ये प्रत्येकी 7.5 गुण मिळवले; परंतु सरस टाय-ब्रेक गुणांच्या बळावर सेतुरामनने बाजी मारली. सेतुरामनने नवव्या आणि अखेरच्या फेरीत हॅकोबायनला पराभूत केले.
अन्य स्पर्धकांमध्ये आठव्या फेरीत भारताच्या एन. आर. विशाखचा पराभव केला होता. पाचव्या फेरीत सेतुरामन आणि मुरली यांच्यात बरोबरी झाली होती. त्यातही सेतुरामनने सरस गुणांच्या जोरावर आगेकूच केली.