-->

मकरसंक्रांतीनिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीला तिळगुळाचे दागिने

अलंकारिक पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

कोल्हापूर/ प्रतिनिधी – आज मकर संक्रांत अर्थात नवीन वर्षातला हिंदूधर्मातील पहिला सण… यानिमित्ताने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या आजच्या अलंकारिक पूजेसाठी आज तिळगुळाचे दागिने वापरण्यात आले होते… 

आज मकर संक्रांत असल्याने तिळगुळ आला मोठं महत्व असतं त्यामुळे आजच्या या अलंकारिक पूजेत तिळगुळ यांच्या दागिन्यांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजची अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा बैठ्या स्वरूपात बांधली होती आणि सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी तिळगुळाच्या दागिन्यांचा वापर पूजेत श्रीपूजकांनी केला आहे. 

तसेच आजच्या अलंकारिक पूजेसाठी अंबाबाई देवीला काळी साडी देखील परिधान करण्यात आली होती. त्यामुळे अंबाबाई देवीचे रूप अधीकच उजळून निघालं होतं. ही पुजा पाण्यासाठी कोल्हापूर सह राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.