भिगवण – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि. 14) ते रविवार (दि. 20) या कालावधीत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
दरवर्षी भाजपच्यावतीने भिगवण परिसरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याप्रसंगी भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण दगडे, इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकते यांनी भिगवण कोविड सेंटर येथे वाफेचे मशीन, रुग्णांसाठी लागणारे काढा साहित्य, हॅन्डवॉश आदी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कोविड सेंटरच्या डॉ. मृदुला जगताप, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती वनवे, अशोक पांचगणे, इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे, रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर, तालुका उपाध्यक्ष माऊली मारकड, नानासाहेब बंडगर योगेश बंडगर, सागर गायकवाड उपस्थित होते.