चिंबळी – आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श मार्गदर्शनप्रमाणे वागल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत प्रबोनधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले.
निघोजे येथे माजी सरपंच दयानंद येळवंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने रक्तदान शिबिर आणि इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 160 जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिलाताई शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, नगरसेवक पंकज भालेकर, उपसरपंच सचिन येळवंडे, नाना टाकळकर, सतीश राक्षे, अशोक खांडेभराड, पंचकृषितील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, संचालक, मान्यवर उपस्थित होते.