नवी दिल्ली: आरआरसीटीसीने रेल्वेच्या ई तिकीटांवर पुन्हा सेवा कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार आहे. नॉन एसी क्लास साठी प्रति तिकीट 15 रूपये आणि एसी क्लाससाठी 30 रूपये इतक्या दराने हा सेवा कर आकारला जाणार आहे. त्या खेरीज जीएसटीही स्वतंत्रपणे लागू केला जाणार आहे.
डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपुर्वी ई तिकीटांवरील सेवा कर काढून टाकण्यात आला होता पण आता ग्राहकांना जीएसटी बरोबरच सेवाकराचाही स्वतंत्र भुर्दंड पडणार आहे. या प्रस्तावाला अर्थमंत्रालयानेही मान्यता दिली आहे. त्यासाठी त्यांनी सेवा कर काढून टाकण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपातच लागू होता अशी मखलाशी केली आहे.