“सर्व्हर डाऊन’मुळे सर्वसामान्यांची दमछाक

ठोसेघर – परळी येथील बॅंकेत वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने मैलोन्‌मैल पायपीट करून येणाऱ्या परळी खोऱ्यातील लोकांना निराश हाताने माघारीचा रस्ता धरावा लागत आहे. या प्रकाराने बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कसलाही फरक पडत नसला तरी ऐन उन्हा-तान्हात सर्वसामान्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.

सणासुदीसाठी तसेच शनिवार, रविवार या सलग सुट्ट्यामुळे परळी खोऱ्यातील बॅंकेमध्ये लोकांची पैशे काढण्यासाठी मोठी गर्दी होत होती. मात्र, बॅंकेचा सर्व्हरच वारंवार डाऊन होत असल्याने मैलोन्‌मैलाची पायपीट करून आलेल्या लोकांना तासन्‌तास बॅंकेतच बसून राहवे लागले. एवढे करूनही सर्वांची पैशाची गरज बॅंकेला भागविता आली नाही. त्यामुळे या सर्वसामान्य नागरिकांना बॅंकेची वेळ संपताच पुन्हा मोकळ्या हाताने

निराश चेहऱ्याने घरचा रस्ता धरावा लागला. विशेषत: असे प्रकार याठिकाणी अनेकदा होत असल्याचेही या नागरिकांमधून सांगितले जात होते. मात्र, सर्व्हरच डाऊन असल्याने करणार तरी काय यापेक्षा वेगळ उत्तर कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून या सर्वसामान्यांना ऐकायला कधी मिळाले नाही. त्यामुळे बॅंक व्यवस्थापनाने सर्व्हर डाऊनवर वेगळी उपाय करून
लोकांची वारंवार होत असलेली ही होरपळ थांबवावी अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.