सीरम लसीचा दर ठरला!

नवी दिल्ली – लस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने खुल्या मार्केट मधील कोविशिल्ड लसीचे दर निश्‍चीत करून आज ते जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्य सरकारांना या लसीचा डोस चारशे रूपये दराने विकला जाणार असून खासगी रूग्णालयांसाठी मात्र हा दर 600 रूपये इतका असणार आहे.

सीरमने ट्‌विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की देशातील लसीची वाढती मागणी लक्षात घेऊन लस उत्पादनाचे प्रमाण येत्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढवले जाणार आहे.

कंपनीने म्हटले आहे की आमच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के लस आम्ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार केंद्र सरकारला देणार असून उर्वरीत 50 टक्के उत्पादन राज्य सरकारे आणि खासगी रूग्णालयांना दिले जाणार आहे. देशात आत्तापर्यंत जे लसीकरण झाले आहे त्यात मोठ्या प्रमाणात सीरमचीच लस वापरली गेली आहे.

त्यांचे हे प्रमाण तब्बल 91 टक्‍के इतके आहे. देशात सीरम बरोबरच भारत बायोटेक या कंपनीचीही लस उपलब्ध आहे. या दोन लसींखेरीज विदेशातून अन्य कंपन्यांचेही डोस आयात करण्याच्या हालचाली सध्या केंद्रीय पातळीवरून सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.