नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले. दुर्दैवी घटनेतील जीवितहानीमुळे मी व्यथित झालो. या दु:खद प्रसंगात मी प्राण गमवावे लागलेल्यांच्या कुटूंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, अशी भावना मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.
तर, आगीमध्ये जीवितहानी झाल्याचे ऐकून अतिशय वेदना झाल्या. संबंधित ठिकाणी पुन्हा आग लागल्याचे वृत्त चिंताजनक आहे. सर्वतोपरी मदत पुरवण्याची विनंती मी राज्य सरकारला करतो, अशा आशयाचे ट्विट राहुल यांनी केले.