-->

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावालाही लसीकरण मोहिमेत सहभागी ;ट्विट करत दिली माहिती

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही आज या लसीकरण मोहिमेत आपला सहभाग नोंदवला.अदर पुनावाला यांनी लस टोचून घेतली असून लस घेतल्यानंतर कोणतेहे दुष्परिणाम जाणवत नाही हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी लस घेतली. अदर पुनावाला यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

त्यांनी लिहिलं आहे की, जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारने या लसीच्या वितरणासाठी पहिली ऑर्डर दिली होती. सीरम इन्स्टिट्यूटकडून तब्बल एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्यात आले आहे. एका डोसमागे दोनशे रुपये या दराने केंद्र सरकारने ही लस खरेदी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कोविशील्ड लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत. परंतु हे पूर्ण पाच कोटी न पुरवता सध्या पहिल्या टप्प्यात फक्त एक कोटी दहा लाख डोस पुरवण्याचीच ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.