लंडन : हॉंगकॉंगमध्ये लागू केलेला नवा सुरक्षा कायदा हा चीन इंग्लंडमध्ये 1984च्या संयुक्त जाहीरनाम्याचे गंभीर उल्लंघन आहे, असे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉनसन म्हणाले. या कराराच्या आधारेच हॉंगकॉंगचे चीनकडे हस्तांतरण केले होते.
बिजिंगच्या कृतीने हॉंगकॉंगच्या स्वायत्ततेचे आणि संयुक्त जाहीरनाम्यात राखीव ठेवलेल्या हक्काचे उल्लंघन होत आहे. या कायदा त्या भूभागाच्या मूळ कायद्याशी विसंगत आहे, असे ब्रिटनचे ठाम आहे, असे पंतप्रधान जॉन्सन म्हणाले.
पत्रकारांशी जॉन्सन बोलत होते. ते म्हणाले, चीनचा हाच मार्ग कायम राहिला तर तेथे राहणाऱ्या नागरिकांना इंग्लंडमध्ये काही काळ वास्तव्य करता येईल. त्यानंतर त्यांना येथील नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची मूभा देण्यात येईल. चीनची ही कृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगून ते म्हणाले, हे पाऊल अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. हॉंगकॉंगमधील नागरिकांशी असणाऱ्या बांधिलकीचा इंग्लंड नेहमी सन्मान करेल.
हॉंगकॉंगच्या नागरिकांना पाच वर्षासाठी मर्यादित रजा मंजूर करण्यात येईल. या पाचवर्षानंतर त्यांना स्थानिक दर्जासाठी अर्ज करता येईल. त्यानंतर एक वर्षाने नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील. अशा विचित्र परिस्थितीसाठी ही सोय करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्री डोमोनिक राब यांनी सांगितले.