प्रश्‍न गंभीर: आजचे लसीकरण करणार कसे?

गुरुवारी सायंकाळअखेर महापालिकेकडील लसीचा साठा पूर्ण संपला

पुणे – महापालिकेकडे आता लसच शिल्लक नसल्याने शुक्रवारी लसीकरण कसे करायचे? हा प्रश्‍न प्रशासनापुढे सध्या निर्माण झाला आहे. गुरुवारीही लस कमी होती, त्यामुळे सेशन कमी करून असलेल्या साठ्यांमधून 18 हजार 480 जणांनाच लस देण्यात आली.

शहरात सध्या 20 हजारांच्या पुढे दिवसाला लसीकरण होते. मात्र, लस उपलब्ध नसल्याने गुरुवारी लसीकरण कमी झाले, तसेच 130 केंद्रच सुरू ठेवण्यात आले होते. गुरुवारी जरी जेमतेम लस उपलब्ध असली तरी शुक्रवारी काय, असा प्रश्‍न आता महापालिकेपुढे पडला आहे.

राज्याकडेच लस उपलब्ध झाली नसल्याने महापालिकेला अद्याप लस मिळाली नाही. 10 तारखेपर्यंत केंद्राकडून राज्याला लस मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर तातडीने त्याचे वितरण होऊन महापालिकेला लस मिळण्याची शक्‍यता आहे.

गरुवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात 54 हजार 59 जणांचे लसीकरण झाले. पुणे ग्रामीणमध्ये 25 हजार 561, पुणे महापालिका हद्दीत 18 हजार 480, पिंपरी-चिंचावड महापालिका हद्दीत 10 हजार 18 जणांना लस देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.