नगरमधील हत्या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल

नगर: अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाहातून घडलेल्या हत्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रेमविवाह केलेल्या नव दाम्पत्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्‍यातील निघोज येथे घडली. यामध्ये रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय 19) हिचा 70 टक्के भाजल्याने मृत्यू झाला. गेली पाच दिवस रुख्मिणी मृत्यूशी झुंज देत होती. दोन दिवसांपूर्वी तीचा पारनेर पोलीसांनी जबाब घेतला होता. वडील, काका, मामा यांनी आमच्या दोघांच्याही अंगावर पेट्रोल ओतून आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तीने जबाबात सांगितल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान मंगेश चंद्रकांत रणसिंग हा सुद्धा 60 टक्के भाजला असुन तो सुद्धा अत्यवस्थ असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

नगरमधील हत्या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.