मिलान : इटलीच्या तुरिनमध्ये झालेल्या सिरी ए फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात युव्हेन्ट्स संघाने कॅगलिरी संघावर ४-० ने मात केली. विशेष म्हणजे या सामन्यात युव्हेन्ट्सचा स्टार फुटबाॅलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सिरी ए फुटबाॅल स्पर्धेतील पहिली तर कारकिर्दीतील ४४ वी हॅटट्रिक नोंदवली.
Una tripletta di @Cristiano regola il @CagliariCalcio! ⚽️⚽️⚽️
4️⃣-0️⃣ per la @juventusfc all'Allianz Stadium.#SerieATIM #WeAreCalcio pic.twitter.com/wuapnrmrOk— Lega Serie A (@SerieA) January 6, 2020
या सामन्यात रोनाल्डोने सामन्याच्या ४९व्या, ६७व्या आणि ८२व्या मिनिटाला असे तीन गोल करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.तर गोन्झालो हिगुनने ८१ व्या मिनिटाला चौथा केला.
Amazing feeling to kick off 2020 with a hat-trick and a victory!⚽⚽⚽💪🏽#finoallafine #forzajuve pic.twitter.com/M8XD1ZQrhl
— Cristiano Ronaldo (@Cristiano) January 6, 2020
रोनाल्डो हा हॅटट्रिकच्या बाबतीत बर्सिलोनाच्या लियोनल मेसीनंतर दुस-या स्थानी पोहचला आहे. मेस्सीने ४७ वेळेस हॅटट्रिक नोदंवली आहे तर रोनाल्डोच्या नावे ४४ हॅटट्रिक आहेत.