#SerieA Football : नेपोली संघाचा युव्हेन्ट्सवर २-१ ने विजय

तूरिन (इटली) : इटलीच्या ‘सिरी ए’ फुटबाॅल लीगमधील सामन्यामध्ये नेपोली संघाने युव्हेन्ट्सचा २-१ असा पराभव करत विजय मिळविला. या पराभवानंतरही युव्हेन्ट्सचा संघ ५१ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे.

नेपोली संघाकडून पियोट्र जिलिंस्कीने ६३ व्या मिनिटाला पहिला तर लोरेंजो इसिंग्ने याने ८६ व्या मिनिटाला दुसरा व विजयी गोल केला.

युव्हेन्ट्स संघाकडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने ९० व्या मिनिटाला एकमेव गोल केला. सलग ८ सामन्यात गोल करणारा पोर्तुगालचा रोनाल्डो हा युव्हेन्ट्स संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी २००५ मध्ये डेविड या फुटबाॅलपटूने ही कामगिरी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.