ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या दोन गोलाच्या जोरावर जुवेंटसने यूडिनेसेचा ३-१ ने पराभव केला आहे. या विजयासह सीरी ए फुटबाॅल स्पर्धेच्या गुणतालिकेत जुवेंटसने अव्वल स्थानी पोहचला आहे.
जुवेंटसकडून ख्रिस्टियानो रोनाल्डोने ९ व्या आणि ३७ व्या मिनिटाला तर लियानार्डो बोनुची याने ४५ व्या मिनिटाला गोल केला. यूडिनेसेकडून इग्नासियो पुसेटोने (९०+४) एकमेव गोल केला. रोनाल्डोने या मोसमात जुवेंटस कडून १९ सामन्यात ११ गोल केले आहेत.
Full time #JuveUdinese 3-1
9' ⚽Ronaldo, 🅰️Dybala
37' ⚽Ronaldo, 🅰️Higuain
45' ⚽Bonucci, 🅰️Demiral
90+4' ⚽Pussetto, assist tbc pic.twitter.com/FaGhGBylgU— TirtoID Liga Fantasia 2021/22 (@LigaFantasiaID) December 15, 2019
दुसरीकडे इंटर मिलान आणि फ्लोरेंटिना यांच्यातील सामना १-१ ने बरोबरीत सुटला. जुवेंटस आणि इंटर मिलान या दोन्ही संघाचे १६ सामन्यात ३९ गुण आहेत पण गोल करण्याच्या सरासरीच्या आधारावर जुवेंटस अव्वलस्थानी तर इंटर मिलान दुस-या स्थानी आहे.