सेरेनाचे लक्ष्य 24 व्या ग्रॅण्ड-स्लॅम विजयाचे

मेलबर्न: ऑस्ट्रेलियन ओपनच्या खुल्या जागतिक टेनिस स्पर्धेच्या जानेवारी महिन्यातील 115 व्या आवृत्तीसाठी सर्वच आघाडीच्या विद्यमान खेळाडूंचा सहभाग निश्‍चित झाला आहे. त्यामध्ये पुरुष एकेरीत अव्वल मानांकित राफेल नदाल आणि महिला एकेरीत ऍश्‍ले बार्टी हे आघाडीचे खेळाडू असणार आहेत.

दिनांक 20 जानेवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान मेलबर्न पार्क येथे होत असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोचे पुनरागमन होईल. या स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियन ओपनची सामन्यात सातवेळा विजेती सेरेना विल्यम्सचे आता 24 व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदावर लक्ष्य असेल.

निवृत्त ऑस्ट्रेलियन टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या 24 विजेतेपदाच्या बरोबरीचे लक्ष सेरेनासमोर असेल. तसेच विल्यम्सची 39 वर्षांची बहीण व्हीनसही, या स्पर्धेद्वारे पुन्हा एका वर्षासाठी पुनरागमन करणार आहे.

गेल्या दशकात, वर्ष 2014 चा स्टॅन वावरिंकाचा अपवाद वगळता पुरुषांच्या स्पर्धेवर नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांनी वर्चस्व मिळवले आहे, तर नदालने वर्ष 2009 मध्ये पहिला आणि आजवरचा एकमेव मुकुट
जिंकला होता. माजी विजेती कॅरोलीन वोज्नियाकीची निवृत्ती घेण्यापूर्वीची ही स्पर्धा शेवटची असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.