सेरेना-एलिनाची महिला एकेरीच्या उपांत्यफेरीत धडक

New York: Serena Williams, of the United States, reacts after defeating Petra Martic, of Croatia, during round four of the US Open tennis championships Sunday, Sept. 1, 2019, in New York. AP/PTI(AP9_2_2019_000013B)

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा
न्युयॉर्क: अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि यूक्रेनची एलिना स्वितोलिना यांनी यावर्षीच्या चौथ्या आणि अखेरच्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीमध्ये क्रोएशियाच्या पेट्रा मार्टीकला 6-4, 6-3 पराभूत करत सेरेनाने 16 व्या वेळेस अमेरिकन ओपनच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. सामन्यादरम्यान टाचेला झालेल्या दुखापतीमुळे 37 वर्षीय सेरेनाला ब्रेक घ्यावा लागला. त्यातून सावरत तिने विजय संपादन करत विक्रमी 24 व्या ग्रॅंडस्लॅमच्या दिशेने आणखी एक पाउल टाकले.

तर, महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या स्तितोलिनाने अमेरिकेच्या मेडिसन कीजला 7-5,6-4 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्वितोलिनासमोर आता ब्रिटनच्या योहाना कोंटाचे आव्हान असणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ले बार्टीला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या किआंग वांगने फ्रेंच ओपन विजेत्या बार्टीवर 6-2, 6-4 अशी सनसनाटी मात केली. जागतिक क्रमवारीत बार्टी दुसऱ्या, तर वांग 18व्या स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या बांग कियांग समोर आता सेरेनाचे आव्हान असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)