मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध डायरेक्टर सतीश कौशिक यांना आपला सुपरहिट ‘तेरे नाम’ या चित्रपटाचा सीक्वल बनवायचा आहे. सतीश कौशिक यांनी 2003 साली सलमान खान आणि भूमिका चावला या जोडीला घेऊन सुपरहिट चित्रपट तेरे नाम बनवला होता.
बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा सुरू आहे. सतीश कौशिक यांनी याबाबत म्हटले, त्यांच्याकडे अनेक कथा आहेत, त्या कथानकानुसार या चित्रपटाचा सीक्वल बनविला जाऊ शकतो.
सतीश कौशिक पुढे म्हणाले, तेरे नाम या चित्रपटातील राधे या पात्राची कथा जिथे संपली होती, तेथूनच पुढचे कथानक असणार आहे.
त्यांनी सांगितले की, हा चित्रपट बनविण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कथा उपलब्ध आहेत. मात्र, त्यांनी याबाबत सलमान खानशी अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही.