अमेरिकेत 9/11 ला झालेल्या ‘त्या’ हल्ल्याला 20 वर्ष पुर्ण; अध्यक्ष बायडेन म्हणाले..

न्यूयॉर्क – अमेरिकेने 9/11 ला झालेल्या हल्ल्याच्या स्मृति दिनीनिमीत्त या हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहतानाच या घटनेच्या दुख:द स्मृति जागवल्या. 20 वर्षांपुर्वी अमेरिकेत तीन ठिकाणी विमाने धडकावून हल्ले करण्यात आले होते. न्यूयॉर्क येथील ट्विन टॉवर्सही यावेळी पाडण्यात आले होते.

ज्या तीन ठिकाणी विमाने धडकावून हल्ले करण्याचा प्रकार घडला होता, त्या तिन्ही ठिकाणी अध्यक्ष बायडेन यांनी आज भेटी देऊन तेथील मृतांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली, व्हाइट हाऊसतर्फे त्यांचा ध्वनिमुद्रीत संदेशही ऐकवण्यात आला. या संदेशात अध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यानंतर अमेरिकन नागरीकांमध्ये देशभर जे सहकार्याचे वातावरण निर्माण झाले होंते तेच वातावरण अमेरिकन नागरीकांनी जागवण्याची गरज आहे.

या हल्ल्याला कितीही वर्ष झाली असली तरी त्याच्या स्मृति जेव्हा आपल्या मनात येतात त्यावेळी काही सेकंदांपुर्वीच हा हल्ला झाल्यासारखा आपल्याला वाटत राहतो. पहिल्यांदा बायडेन यांनी पुर्वी ज्या ठिकाणी ट्विन टॉवर्स उभारण्यात आले होते, तेथे जाऊन आदरांजली वाहिली.

या हल्ल्यानंतर देशवासियांना आधार देण्याची जबाबदारी असलेले अमेरिकेचे ते चौथे अध्यक्ष आहेत. या आधीच्या अध्यक्षांनीही 9/11 च्या स्मृति दिनाच्यावेळी प्रत्येक हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन मृतांना आदरांजली वाहिली होती. डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झाल्यानंतर ते पहिल्यांदाच 2017 मध्ये हल्ल्याच्या ठिकाणी गेले होते, त्याचवेळी त्यांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्याची घोषणा केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.