नवी दिल्ली – भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साइ) बंगळूर येथील केंद्रात सराव करत असलेले हॉकीपटू आता लवकरच आपापल्या घरी परतणार आहेत. मात्र, त्यानंतर जेव्हा हेच खेळाडू साइ केंद्रात परततील तेव्हा त्यांना पुन्हा 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहावे लागेल, असे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.
बेंगळूरु येथील साइ केंद्रात गेल्या तीन महिन्यांपासून हे खेळाडू निवासी म्हणून सराव तसेच प्रशिक्षण घेत होते. त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने खेळाडूंनी घरी परतल्यानंतर काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.