पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये करोना संशयितांसाठी स्वतंत्र बेड

पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये करोना संशयितांसाठी स्वतंत्र 50 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनासारखी लक्षणे असलेल्या, मात्र कोरोनाची चाचणी केलेल्या संशयितांना येथे दाखल करून घेतले जाणार आहे. त्यांच्या घशातील स्राव नमुन्यांची तपासणीही होईल. त्यासाठी जम्बोत स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू होणार असून, रुग्णांवरील उपचाराची व्याप्ती वाढवताना एक्रेसह ब्लड आणि युरिन टेस्टची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा मिळणार आहे.


शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानेजम्बोमध्ये बेड वाढवून नव्या रुग्णांना सामावून घेण्यात येत आहे. करोनाच्या रुग्णांसह तपासणी झालेले अत्यवस्थ रुग्ण पहिल्या दिवसापासून जम्बोमध्ये दाखल होत आहेत.

 

मात्र, त्यांच्यासाठी बेड नसल्याने त्यांना ताटकळत राहावे लागत होते. अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षात बेडची सुविधा उपलब्ध केली असून, उपचारासाठी आल्यानंतर त्यांचा स्वॅब घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार असल्याचे व्यवस्थापन समितीचे समन्वयक राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

क्रस्ना डॉयग्नोस्टिकपुरवणार सुविधा
अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारादरम्यान एक्रे आणि अन्य तपासण्यांसाठीक्रस्ना डॉयग्नोस्टिकने स्वतंत्र लॅब सुरू केली असून, गरजेनुसार रुग्णांना या सुविधा दिल्या आहेत. ज्यामुळे नेमके उपचार करून रुग्णांना करोनामुक्त आणि मृत्यूदर कमी करण्याचा उद्देश आहे. सध्या चारशे रुग्णांसाठीची यंत्रणा उभारण्यात आली असून, गरजेनुसार यंत्रणा आणि मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे, असेक्रस्नाच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.