अधिक उपचारासाठी रुग्ण पुण्यात
फलटण – सर्दी पडसे त्यातून न्यूमोनिया उद्भवल्याच्या निदानानंतर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अधिक उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला स्वाइन फ्ल्यू असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाल्यानंतर अधिक उपचार करण्यात येत आहेत.
मिरढे, ता. फलटण येथील प्रकाश बबन काशीद (वय 38) यांना अधिक उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे दाखल केल्यानंतर त्यांना प्राथमिक अंदाजानुसार स्वाइन फ्ल्यू असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यादृष्टीने उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरु केले असून मिरढेप्रमाणे साखरवाडी येथे संशयित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधक उपाय योजना, जनजागृती, प्रबोधन, प्रतिबंधक गोळ्या सुरु करण्याबाबत सूचना प्रा. आरोग्य केंद्रांना दिल्या असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदाळे यांनी सांगितले आहे.