शेअर बाजारात तेजी कायम

मुंबई: कॉर्पोरेट टॅक्‍स कपातीच्या घोषणेनंतर वधारलेला शेअर बाजाराचा मूड सोमवारीही कायम होता. शेअर बाजार आज सोमवारी सकाळी खुला झाला तेव्हाही निर्देशांक एक हजार अंकांनी वाढलेला होता. शेअर बाजाराचा निर्देशांक 1,075 ने वधारला. निर्देशांक 39,090वर पोहोचला तर निफ्टी 329 अंकांनी वाढून 11,603वर पोहोचला.

आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्‌स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ते टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. या कॉर्पोरेट टॅक्‍स कपातीकडे परदेशी गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.