भारतीय शेअर बाजारात पुन्हा घसरण : सेंसेक्‍स 307 अंकांनी कोसळला

मुंबई : भारतीय शेअर बाजारामध्ये आजही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या पाच महिन्यात सेंसेक्‍स सर्वात निचांकावर पोहोचला आहे. आज सकाळी बाजार उघडताच 307 अंकांनी सेंसेक्‍स कोसळला.

सेंसेक्‍सप्रमाणे आज रुपयाच्या मूल्यामध्येही घसरण दिसून आली असून, एक डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.03 पर्यंत घसरले आहे. दरम्यान, गुरुवारीसुद्धा शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच रुपयाही खूप गडगडला होता. ही पडझड होत असतानाच सोन्याचा दर मात्र वाढला. सोने 150 रुपयांनी वाढून 38,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर चांदीही 60 रुपयांनी वाढून 45,100 रुपये किलो झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.