सेन्सेक्‍स नव्या ऐतिहासिक उंचीवर 

निर्देशांक सध्या ऐतिहासिक पातळीवर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध झालेले आहे. ज्या कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करते, त्या कंपन्यांचे शेअर वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर महागाई, घसरणारा रुपया आणि अस्थिर क्रुडचे दर या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. 
विनोद नायर, संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीय संस्था 
नवी दिल्ली: देशातील संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनीही खरेदी चालू ठेवल्यामुळे शेअर निर्देशांकांत वाढ चालू आहे. मात्र, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्यामुळे
निर्देशांकाच्या वाढीचे प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 33 अंकांनी म्हणजे 0.09 टक्‍क्‍यांनी वाढून 36858 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्‍स तब्बल 473 अंकानी वाढला आहे. आता सेन्सेक्‍सला 37 हजारांचे वेध लागले असल्याचे वातावरण शेअरबाजारात आहे. राष्ट्रीय शेअरबाजाराचा
निर्देशांक निफ्टी मात्र केवळ 2 अंकानी कमी होऊन 11132 अंकावर बंद झाला. काही गुंतवणूकदार नफाही काढून घेत आहेत. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 104 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 513 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. रुपया गेल्या दोन दिवसात काही प्रमाणात मजबूत झाल्यामुळेही
निर्देशांकांना आधार मिळत आहे. संमिश्र वातावरणामुळे आज मिडकॅप 0.12 टक्‍क्‍यांनी कमी झाला तर स्मॉल कॅप 0.23 टक्‍क्‍यांनी वाढला. आज धातू, वित्त, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, बॅंकिंग आणि ग्राहक उपयोगी वस्तू क्षेत्र तेजीत होते. तर ऊर्जा, रिऍल्टी, तंत्रज्ञान, दूरसंचार, आरोग्य या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. परदेशातून आज संमिश्र संकेत आले, तरी भारतीय शेअरबाजारात सकारात्मक वातावरण होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)