शेअर बाजार विक्रमी स्तरावर; सेन्सेक्स ३७ हजार पार

नवी दिल्ली – सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार विक्रमी स्तरावर असून आज सेन्सेक्स ३७ हजाराचा टप्पा पार करत ऐतिहासिक स्तरावर पोहोचला. तर निफ्टीनेही ११,१७१ अंकावर झेप घेत विक्रम केला आहे.

शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून तेजी आहे. आजही सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने १२३ अंकांनी उभारी घेत ३७ हजाराचा टप्पा गाठला. तर निफ्टीनेही २९ अंकांनी झेप घेत ११, १६३ अंकांवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडमोडींचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपीय संघात महत्वाचे करार झाल्याने शेअर बाजारात तेजी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)