Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज 20 सप्टेंबर रोजी एक नवा इतिहास घडला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही आपापल्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सने प्रथमच 1,360 अंकांच्या उसळीसह 84,000 चा टप्पा पार केला. त्याचवेळी निफ्टीनेही 25,800 चा टप्पा ओलांडून नव्या ऑल टाइमला स्पर्श केला. बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले. रियल्टी, ऑटो, कॅपिटल गुड्स आणि बँकिंग समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 1,359.52 अंकांनी किंवा 1.63 टक्क्यांनी वाढून 84,544.31 वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने 84,694.46 चा नवा उच्चांक गाठला. दरम्यान, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 375.15 अंकांनी किंवा 1.48 टक्क्यांनी वाढून 25,790.95 वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात तो 25,849.25 चा नवा उच्चांकही गाठला.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग आज हिरव्या रंगात होते. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 5.57 टक्के वाढ झाली. यानंतर जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि भारती एअरटेलचे समभाग 2.65 ते 3.85 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले शेअर्स –
तर सेन्सेक्सचे केवळ 4 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि बजाज फायनान्सचे शेअर्स 0.07 टक्क्यांवरून 0.33 टक्क्यांनी घसरले.