Share Market Closing 23 Oct : सातत्याने परकीय भांडवल काढून घेत असताना ऑटो, फार्मा आणि कॅपिटल गुड्स कंपन्यांच्या शेअर्समधील नफावसुलीमुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली.
सेन्सेक्स आणि निफ्टी 0.15% पेक्षा जास्त घसरले –
अस्थिर सत्रात, बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स 138.74 अंक किंवा 0.17 टक्क्यांनी घसरून 80,081.98 वर बंद झाला, तर त्यातील 22 घटक समभाग घसरले. व्यापारादरम्यान बेंचमार्क 80,000 अंकांच्या खाली घसरला आणि 79,891.68 अंकांवर पोहोचला होता.
NSE निफ्टी 36.60 अंकांनी किंवा 0.15 टक्क्यांनी घसरून 24,435.50 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक आणि टायटन हे सर्वात जास्त घसरणीसह बंद झाले.
बुधवारी बाजार बंद होताना सेन्सेक्समधील 30 समभागांची स्थिती –
बजाज फायनान्सचा समभाग पाच टक्क्यांनी वाढला –
बजाज फायनान्सचा समभाग सुमारे 5 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीने म्हटले आहे की सप्टेंबर 2024 ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत तिचा एकत्रित निव्वळ नफा 13 टक्क्यांनी वाढून 4,014 कोटी रुपये झाला आहे.
टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर आज मोठ्या नफ्यात राहिले. एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी 3,978.61 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 5,869.06 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
निफ्टीचे टॉप गेनर्स आणि टॉप लॉजर्स शेअर्स –
एफआयआयच्या भूमिकेमुळे बाजारावर परिणाम –
बाजार तज्ज्ञांच्या मते, तिमाही निकालांमध्ये कंपन्यांची कमी कमाई आणि FII ची अचानक प्रतिक्रिया यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता निराशाजनक बनली, ज्याचा परिणाम बाजारातील दरावर झाला.
सोल, शांघाय आणि हाँगकाँगमध्ये आशियाई बाजार वधारले, रुपया सपाट –
आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमध्ये वाढ झाली, तर टोकियोमध्ये घसरण झाली. युरोपीय बाजारात संमिश्र कल होता. मंगळवारी अमेरिकन बाजार सपाट बंद झाले होते. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.97 टक्क्यांनी घसरून 75.30 डॉलर प्रति बॅरलवर आले. मंगळवारी BSE बेंचमार्क निर्देशांक 930.55 अंकांनी किंवा 1.15 टक्क्यांनी घसरून 80,220.72 वर बंद झाला होता. तर NSE निफ्टी 309 अंकांनी किंवा 1.25 टक्क्यांनी घसरून 24,472.10 अंकांवर बंद झाला होता. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया सपाट राहिला आणि 84.08 च्या पातळीवर बंद झाला आहे.