मुंबई – मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. रात्री पावणेबाराच्या दरम्यान हा निनावी फोन आला होता. यामुळे आमदार निवास तात्काळ रिकामे करण्यात आले आहे.
Maharashtra: Mumbai police evacuated people from MLA hostel after receiving a bomb threat call.
Police say,”Around 150 people were there in building. We’ve checked thoroughly & have not found any explosive material. The phone number has been traced,further action will be taken.” pic.twitter.com/7ZVCp3nGBj
— ANI (@ANI) September 28, 2020
मुंबईतील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवासाला अज्ञात क्रमांकावरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली. आणि श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ आमदार निवास रिकामे केले. बॉम्ब शोधक पथकाने रात्रभर प्रत्येक मजल्यावरील रूम चेक केल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून आमदार निवासापासून ५० मीटरपर्यंत बॅरिकेट लावण्यात आले आहेत.
रात्रभर शोधाशोध केल्यानंतर कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू हाती लागली नसल्याने हा निव्वळ कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, हा फोन आला कुठून आणि कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहे.