मेढा (प्रतिनिधी)- गांजे येथील व्यक्तीचा मृत्यूपश्चात अहवाल पाँझिटिव्ह आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
गांजे (ता. जावळी) येथे मुंबईहून आलेल्या एका ४८ वर्षीय पुरुषाला शनिवारी अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्याला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूपश्चात तपासणी अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने गांजे परिसरासह जावळी तालुक्यात घबराट पसरली आहे.
नवी मुंबई तुर्भे येथे बेस्टमध्ये ड्रायव्हर असणारे ४८ वर्षीय पुरुष २ जून रोजी पास काढून गांजे येथे आला होता. त्यानंतर त्याला घरीच होम क्वारंटाइन करण्यात आले. करोनाचे कोणतेही प्राथमिक लक्षणे दिसून येतं नव्हती. शनिवारी सकाळी अचानक ह्रुदयविकाराचा झटका आल्याने स्थानिक युवकांनी खासगी वाहनाने सातारा येथे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलमध्ये नेण्याअगोदरच त्याचा म्रुत्यू झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या युवकांना व कुटुंबीयांना होम क्वारंटाइनचे आदेश दिले आहेत तर काहीना रायगाव येथे विलगीकरण कक्षात नेण्यात आले आहे.
जावळी तालुक्यातील रुग्णांची संख्या ७ वर पोचली अहे. भणंग आणि धोंडेवाडी येथे प्रत्येक ४ रुग्ण आढळल्यानंतर गेल्या चार दिवसांमधे तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. यामुळे थोडा दिलासादायक वातावरण होते मात्र या करोनाबाधिताच्या म्रुत्यूमुळे तालुक्यात घबराट पसरली आहे .
मृतदेहाच्या संपर्कात अनेक जण …
तुर्भे येथुन आलेल्या गांजे येथील ४८ वर्षीय ड्रायवरला शनिवारी दुपारी अचानक या व्यक्तीला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने स्थानिक युवकांनी व ग्रामस्थांनी इस्पितळात दाखल केले होते. यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तीना हायरिस्कचा धोका आहे. प्रशासनाने क्वारंटाइन होण्याचे आदेश दिले आहेत .