आयफोनच्या नादात ज्येष्ठ महिलेने गमावले 4 कोटी !

पुणे :  फेसबुक फ्रेंडने गिफ्ट पाठवलेला आयफोन मिळविण्यासाठी एका ज्येष्ठ महिलेने तब्बल 4 कोटी रुपये गमावले. याप्रकरणी एका 60 वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधीत महिला एका खासगी कंपनीत उच्च पदावर कामाला आहे.

महिलेने सायबर भामट्यास तब्बल 25 बॅंकांच्या 67 खात्यांमध्ये 207 ट्रांन्सजॅक्‍शनव्दारे ही रक्कम वर्ग केली आहे. इतकी रक्कम वर्ग करुनही गिफ्ट न भेटल्याने तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिलेला मार्च 2021 मध्ये एका व्यक्तीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ओळख वाढल्यानंतर आरोपीने त्यांना व्हॉटसअप नंबर दिला. यानंतर त्यांच्यामध्ये संवाद वाढत गेला. आरोपीने त्यांना आयफोन गिफ्ट पाठवला असून तो दिल्ली येथील कस्टम ऑफिसमध्ये आला असल्याचे सांगितले. यानंतर तो मिळविण्यासाठी एक मोबाईल नंबर दिला.

संबंधीत मोबाईलधारकाने आयफोन व्यतिरीक्त गिफ्टमध्ये ज्वेलरी व फॉरेन करंन्सी असल्याचे सांगितले. तसचे कस्टम डयुटी व इतर कारणे सांगत वेगवेगळ्या 25 बॅंकांच्या 67 खात्यांमध्ये वारंवार पैसे भरायला लावून 3 कोटी 98 लाख 75 हजार रुपये वर्ग करुन घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.