मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 136 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.
ही स्पर्धा डॉ. जी. ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ऑक्टोबरला होणार आहे, अशी माहिती संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी दिली.
ही स्पर्धा पुरुष गटात 35, 45, 55 आणि 65 वर्षांवरील एकेरी व दुहेरी गटात होणार आहे. तर, 35 व 45 वर्षांवरील महिलांच्या एकेरी व दुहेरी या गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी लीना नागेशकर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.