ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज दिल्लीत दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांना अल्झायमरचा विकार होता. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या काळातील अनेक वर्षे ते सार्वजनिक जीवनातून दूरच होते. त्यातच त्यांना अलिकडेच स्वाईन फ्ल्यूही झाला होता त्यातच त्यांचे निधन झाले. कामगार नेते, समाजवादी विचारांचे नेते आणि धडाडीचे राजकीय नेते अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. त्यांनी जनता पार्टीचे सरकार, व्ही. पी. सिंग आणि वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू अशा अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ते मुळचे मंगळुरूचे होते पण नंतर त्यांनी मुंबई आणि बिहार या ठिकाणाहून लोकसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. बिहारमध्ये त्यांनी मोठेच राजकीय बस्तान बसवले होते. 1969 ते 2004 या अवधीत त्यांनी एकूण नऊ वेळा लोकसभेच्या निवडणुका िंजंकल्या होत्या. रेल्वे, उद्योग, दूरसंचार, संरक्षण अशा खात्यांचा त्यांनी केंद्रात कार्यभार पाहिला आहे. संयुक्त समाजवादी पक्षापासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. नंतरच्या काळात त्यांनी समता पार्टी नावाचा एक स्वतंत्र राजकीय पक्षही काढला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राममनोहर लोहीया यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मुंबईत त्यांनी रेल्वे कर्मचारी आणि अनेक कामगार संपांचे नेतृत्व करून आपल्या नेतृत्वाचा मोठाच दबदबा निर्माण केला होता. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले असून त्यांनीच केंद्रीय पातळीवर हा प्रकल्प लावून धरला होता. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी लैला कबीर आणि मुलगा सीन फर्नांडिस असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव सध्या अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट बॅंकर म्हणून कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)