ज्येष्ठ चित्रकार अकबर पदमसी यांचे निधन

कोईम्बतूर : देशातील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक आणि इशा योग सेंटरमधील प्रोग्रेसिव्ह मॉडर्निस्ट चळवळीचे प्रणेते अकबर पदमसी यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. काल रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर इशा योग सेंटरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

इशा योग सेंटरच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. पदमसी हे रंग आणि आकारबद्धतेत निपुण कलाकार होते. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कालावधीमध्ये त्यांनी इशा योग सेंटरलाच आपले घर केले होते.

ही आपल्यासाठी सौभाग्याची बाब असल्याचे इशा फौंडेशनचे संस्थापक सद्‌गुरू जग्गी वासुदेव यांनी सांगितले. येणाऱ्या पिढ्या अकबर पद्‌मसी यांच्या रंगाच्या जादूने प्रेरित होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.  भानू ईशा योग केंद्रातील रहिवासी होते.

काही वेळा केंद्राला भेट दिल्यानंतर त्यांनी या केंद्रामध्ये कायमचे राहण्याचे ठरवले. पदमसी यांनी कोणत्याही कलात्मक चाकोरीबद्धेला नकार दिला होता. कोणीही त्याच्यावर किंवा त्याच्या कलेवर लेबल लावावे अशी त्याची इच्छा नव्हती, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.