राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बडे नेते आता ट्‌विटरवर

नवी दिल्ली – सोशल मीडियाचा वाढलेला प्रभाव आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही पडल्याचे दिसत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊंट सुरू केले आहे. भागवत यांच्याबरोबर सुरेश जोशी, सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, वी भगैया, अरुण कुमार आणि अनिरुद्ध देशपांडे यांची सध्या ट्‌विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर अकाऊंट दिसत आहेत.

मात्र, आतापर्यंत त्यांनी कोणतेही ट्‌वीट केलेले नाही. सध्या सरसंघचालक मोहन भागवत अधिकृत ट्‌विटर हॅंडलला फॉलो करणाऱ्यांच्या संख्या वाढताना दिसत आहे. सध्या त्यांचे फॉलोअर्स 60 हजारच्याही पुढे गेले आहेत. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलला सध्याच्या घडीला 13 लाखाहून अधिक ट्‌विटर यूजर्स फॉलो करत आहेत. संघाच्या आपल्या ट्‌विटर हॅंडलचा उपयोग आपले मत मांडण्यासाठी आणि सूचना तसेच माहिती देण्यासाठी सुरू केला आहे. फेसबुकवरही संघाचे पेज असून, त्याला आतापर्यंत 54 लाख फेसबुक युजर्सनी लाईक केले आहे.

ट्‌विटरवर सरसंघचालक मोहन भागवत यांचे अकाऊंट ऍटडॉमोहनभागवत अशा नावाने आहे. तत्पूर्वी, संघाचे ट्‌विटर हॅंडल 2011मध्ये अस्तित्वत आले आहे. त्याला आतपर्यंत 13 लाख यूजर्सनी फॉलो केले आहे. गेल्या काही वर्षांत संघाने आपल्यामध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.